७१ वा स्वातंत्र्य दिवस आज आपण साजरा करतोय, असंख्य हुतात्म्यांच्या, शूरविर, नरवीरांच्या, शहिदांच्या बलिदानामुळेच हा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांचा प्रेरणा व उत्साह वाढवणारा राष्ट्राविषयीचा ज्वाजल्य “अभिमान” आणि या आपल्या माञभूमिला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अगणित योध्यांनी प्राणार्पण केलं आहे, या भूमीच ऋण म्हणून लाखो लोकांनी रक्ताची आंघोळ केली आहे, मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लाखो विरांनी आपल्या देहाच्या समिध्या क्रांतीच्या तप्त अग्नित समर्पित केल्या आहेत… असंख्य सैनिकांचं, जवानांचं बलिदान, शौर्य, देशप्रेम, देशभीमान देशासाठी स्वतःच्या घर, कटुंब, संसारावर सोडलेलं पाणी, त्या शहिदांच्या पार्थिवांच्या पेट्या कालही येत होत्या आणि उद्याही येतील, ते तिथं सीमेवर जागे आहेत म्हणून आपण इथं सुरक्षित आहोत या सर्व त्यांच्या त्यागाच देशप्रेम, देशभिमानाची भावना आजच नाही तर ३६५ दिवस त्यां सर्वांचं स्मरण करीत कायम जागृत राहावी.. स्वातंत्र्य दिवस चिरायू होवो…
#जय_हिंद #वंदे_मातरम #भारत_माता_की_जय
#राष्ट्रप्रथम