“मन”…. !!

सर्व जखमा भरायलाच हव्यात असं काही नसतं.. मग त्या शरीरावरील असोत अथवा मनावरील घाव असोत, काही तशाच ताज्या – तवाण्या राहायला हव्यात, शारीरिक जखमा भरून येतीलही पण मनांनी मनावर केलेल्या असहाय्य पण अव्यक्त घाव ते माञ तसेच राहतात, शरीरावरील जखमेचा अंधुक डाग कधी नकळत दृष्टीस पडला तर त्या जखमेची आणि वेदनेचे आठवण जागी करतो पण चेहऱ्यावर मनातील वेदनेचा साधा लवलेशही न जाणवू देणारा आपला बहाय्य चेहरा हसरा ठेवून आपण मिरवत असतो पण आतून मन माञ अनेक जखमांनी जखमी असते..

कधीही, कुणालाही विशेषतः आपल्या स्वतःलाही न दिसणारी अबोल मनावरील ती जखम माञ तशीच ताजीच असते, ती ही कायमच.. विसरू, दुरुस्त करू मनात इच्छा नसतानाही काही गोष्टी मनाविरुद्ध बोलव्या लागतात, स्वतःच स्वतःला समाधानाचा सल्ला देत मनाला खोटे आश्वासन देऊन अश्वस्त करण्याचा प्रयत्नही कधी कधी निष्फळच ठरतो, मनावरील मळभ दूर होईलही पण मनाला झालेली जखम भरून तर येत नाहीच पण ती व्यवस्थितही होत नाही म्हणूनच अस वाटतं की काही जखमा तश्याच ठसठशीत राहायला हव्यात अगदी जिवंत.. याचसाठी की आपल्यालाही कळायला हवं ना.. की इतरांना आणि इतरांचा मान व मन जपत आपलाही प्रवास कोठून कोठपर्यंत झालाय… नाही का..?😊

“रामदास कराड”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: