महाराष्ट्राच्या मातीला शुरविरांची परंपरा आहे, त्यामध्ये माणदेशी सातारच्या मातीची महती तर काही औरच आहे, सैनिक, शहिद आणि शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची वेगळी ओळख आहे, आपल्या देशासाठी विरगती प्राप्त करणं या सातारच्या मातीच्या कणाकणात रुळलेलं आहे, इथं जन्माला आलेल्या प्रत्येक तरुणाच्या नसानसांत देशहीत, देशभक्ती जन्मजात रुजलेली आहे, देशासाठी प्राणांची हसत आहुती देणं हा सातारच्या रक्तातील संस्कार आहे, दरसाल एखाद्या तरी मानदेशीच्या मातीतील विराकडून प्राणाच्या आहुतीचा अभिषेक घालून सीमेवर देशाला वंदन करणं ही या मातीची जणू संस्कृतीच झाली आहे, देशसेवेसाठी “सैनिक” म्हणुन अभिमानाने लष्करात जाणं यात सातारच्या युवकांनी उच्चांक तर गाठलाच आहे पण गौरवी आलेखही वाढता आणि चढता ठेवला आहे..
“कर्नल संतोष महाडिक” हे त्यातल्याच एका शुराचं नाव.. कुपवाडा येथे १७ नव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्लात विरमरण आलेला शहीद.. आज त्यांची आठवण होणं अपरिहार्य आहे त्याचं कारणही तसंच आहे, त्यांच्या पत्नी वय – वर्षे ३८ असलेल्या स्वाती संतोष महाडिक या मुलगी कार्तिकी व मुलगा स्वराज या दोन मुलांच्या आई आहेत, आपला बहादुर पती गमावल्या नंतर मुलांचा, घर – कुटुंबाचा भार आपल्या अंगा – खांद्यावर आला असताना अभिमानाचा हुंदका व आठवणींचे अश्रू पुसत राष्ट्रसेवेसाठी स्वतःला झोकून देत “स्वाती संतोष महाडिक” या भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’ पदावर काल रुजू झाल्या आहेत, स्वाती यांनी आपल्या उच्च विचारांतून या देशाला, या देशातील समस्त स्त्री-पुरुष शक्तीसाठी आदर्श उदाहरण आज घालून दिलं आहे, (स्वाती म्हणतात – मी माझ्या पतीची प्रेरणा घेऊन देशासेवेसाठी स्वतःला समर्पित करत आहे, मलाही माझ्या पतीप्रमाणे दहशतवाद्यांशी लढायचं आहे, माझी मुलगी आणि माझा मुलगा हेही उद्या लष्करातच जातील) स्वाती यांनी देशासाठी आपला पती गमावला. तरी देखील त्यांनी हिंमत न हारता स्वतःला सुद्धा देशसेवेसाठी समर्पित केलं आहे, अशी महान त्यागाची भावना जिवंत असायला ज्वाजल्य देशाभिमान सुद्धा जिवंत असावा आणि ठेवावा लागतो.. या विरस्त्रीला माझा शब्दरूपी सलाम…
#सॅल्युटलेफ्टनंटस्वातीसंतोषमहाडिक
#राष्ट्रप्रथम #जयहिंद #जयभारत _/!\_