“तु म्हणजे माझ्या आयुष्यातून हरवलेलं एक क्षण आहेस, तु वेगळी आहेस कुठे तु तर माझं मन आहेस..,
थरथरतात पावलं आजही तुझ्या दाराशी , प्रामाणिक आहे ‛मी’ अजूनही वेचलेल्या त्या पावसातील गारांशी.. ,
“ तु म्हणजे माझ्या आयुष्यातून हरवलेलं एक क्षण आहेस, तु वेगळी आहेस कुठे तु तर माझं मन आहेस..,
तुटलेलं ‛मन’ जोडण्याचा प्रश्न तेवढा सोपा नसतो , ‛संसार’ म्हणजे झाडावर बांधलेला खोपा नसतो.. ,
“तु म्हणजे माझ्या आयुष्यातून हरवलेलं एक क्षण आहेस, तु वेगळी आहेस कुठे तु तर माझं मन आहेस..,
भरून येतील डोळे तुझे मी तुझ्या जवळ नसताना , एकटं वाटेल ‛तुला’ ; सगळं जग तुझ्या जवळ असताना , पण तु रडू नकोस , कारण तुला माहीत आहे ; मला तुला पाहायचंय नेहमीच हसताना ,
“तु म्हणजे माझ्या आयुष्यातून हरवलेलं एक क्षण आहेस, तु वेगळी आहेस कुठे तु तर माझं ‛मन’ आहेस..,
“ सदैव तुझाच.. अज्ञात मी ”….;