लवकरच अंतिम संघर्षाची दुंदुभी निनादेल.. आम्हाला बंदुकीच्या फैऱ्यांनी उडवा…

तमाम देशवासीयांची इच्छा होती, या अनमोल तरुणवीर क्रांतीकारांना जीवनदान मिळावे, यांना फाशी होऊ नये यासाठी भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांचे वकील श्री.प्राणनाथ मेहता हे फाशीच्या २ दिवस आधी कारागृहात येऊन या वीरांना हाथ जोडून विनंती करत होते की तुम्ही सरकारकडे दयेचा अर्ज द्यावा , तुम्हाला माफी मिळेल, हे वाक्य कानावर पडताच सुखदेव, राजगुरू हे मेहतावर खवळले, भगतसिंहांनी हसून त्या दोघांना शांत केलं आणि म्हणाले की तुम्ही मसुदा तयार करा, एक पत्र आमच्याकडेही तयार असेल, वकील मेहता खुश होऊन परतले आणि मसुदा सोबत घेऊन परत आले, तेव्हा भगतसिंह म्हणाले, तो मसुदा राहू द्या हा कागद पहा, तो कागद म्हणजे भगतसिहांचं आणि मेहतांचं दयेचा अर्जाविषयी बोलणं होण्याच्या आगोदरच पंजाब सरकारला भगतसिंहांनी एक पत्र पाटवल्याची ती एक प्रत होती, त्यात भगतसिंहांनी फाशीची माफी नाही तर बंदुकीच्या गोळ्यांची मागणी केली होती,

२० मार्च १९३१
भारताचे स्वातंत्र्य आता फार दूरचे स्वप्न राहिले नाही, साम्राज्यवाद, भांडवलशाही आता फक्त थोड्याच दिवसांचे पाहुणे आहेत, खुल्या दिलाने आम्ही ज्यात भाग घेतला आणि ज्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, त्या युद्धाची सुरुवात ना आम्ही केली आहे, ना आमच्या प्राणांसोबत समाप्त होणार आहे, आधीच उज्वल बनवलेल्या ऐतिहासिक साखळीमध्ये आमचे बलिदान हे आणखी एक कडी ठरेल, क्रांतीच्या या पुजावेदीवर आम्ही आमचे यौवन नैवैद्य म्हणून आणले आहे, या महान ध्येयासाठी मोठ्यात मोठा त्यागसुद्धा कमीच आहे, आम्ही संतुष्ट आहोत आणि क्रांतीच्या आगमनाची उत्सुकतेनं प्रतीक्षा करीत आहोत या देशात क्रांती “चिरायू” होवो, कोर्टाने आम्हाला फाशीची शिक्षा सुनावली आहे, पण आमची अशी अंतिम इच्छा आहे की (‘आम्हाला युद्धबंदी मानले जावे’ आणि ‘फासावर चडवण्यापेक्षा बंदुकीच्या गोळ्यांनी उडवावे’)

२० मार्च १९३१ फासावर लटकवण्याच्या २ दिवस आधीचे हे पत्र म्हणजे भगतसिंहांच्या उच्चं विचारांची सर्वोत्तम सुपीकता दर्शवत, अवघे २३ वर्ष ५ महिने २३ दिवस जगलेला “शहीद ए आजम – हुतात्म्यांचा मेरूमनी” या देशासाठी प्राणपणाने, प्रसंगी प्राणार्पण करण्याच्या उदात्त हेतूने या देशासाठी झुंजत होता,अगदी शेवटच्या क्षणी इच्छा, आकांक्षा त्याग, आत्मबलिदान काय असू शकते याचं आदर्श, मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगतसिंह, सुखदेव, राजगुरू.. या स्वातंत्र्याचा लढा लढताना अगणित योद्धे मारले गेले; काहींनी या भूमीच ऋण फेडण्यासाठी हसत हसत मृत्यूला आलिंगन दिल, त्यांची आठवण जिवंत ठेवणे त्यांच्या आदर्शवादी विचारांचा जागर करणे हे आपले परमकर्तव्य आहे, आज ‘भगतसिंह’ यांची ८६ वी जयंती आहे; त्यांच्या कार्य-कर्तुत्वाचं स्मरण करत या लेखारूपी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांसमोर मी नतमस्तक होत आहे..

_/!\_
–––––––––––––––––––––––
२८ सप्टेंबर १९०७ – २३ मार्च १९३१
ऐ ‘भगत’ तू जिंदा है, हर लहुँ के कतरें में..
सरहद के उसपार भी.. सरहद के इसपार भी..

© रामदास कराड

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: