आयुष्यात आलेल्या प्रसंगात, वादळात अनेक दुःखाचा, संकटांचा धीरोदात्तपणे सामना करणारे मोठी लोकं गृहकलहात, संसाराच्या फेऱ्यात अडकून पडले, कधी स्वतःच्या शहाणपणात तर कधी स्वतःचंच खरं करण्यात अनेकांचं आयुष्य असंच निघून गेलं याचं आपल्या वेड्या कुंपनात गुंतून, गुरफटून अशी कित्येक जण आपलं उज्वल भविष्य सुद्धा हरवून बसले आहेत..
पण प्रत्येक संकट, अनंत यातना असंख्य अडचणी सोसून, भोगून घरा, दारातील अडचणींतून बाहेर पडत काहीजनांनीच स्वतःचं भविष्य स्वतःच बनवलं आणि घडवलं, काहीतरी बनण्याच्या, वेगळं काहीतरी करण्याच्या इर्षेनं कोणत्याही परिस्थितीत झटत राहिले, जन्मानं मिळालेल्या प्रारब्धाशी दोन हाथ करत आपल्या भविष्यासाठी झुंजत राहिले, भोग भोगत अनेक अपयशही पचवले, पहाडा प्रमाणे कितीतरी मोठं दिव्यं ऐरावत मोजक्यांनीच अगदी लिलया पेललं, तप्त अग्नीत तावून, सुलाखून सोनं झाले, त्याच लोकांना ‘यश’ मिळालं, त्यांनीच इतिहास घडवला आणि त्यांनीच इतिहास लिहलाही..
याच अन अश्याच माणसांच्या भरभक्कम बाहूच्या अंगाखांद्यावर हे लखलखनारं जग आज तरलं आहे, याच लोकांच्या अंगात ठासून भरलेल्या हार न मानणाऱ्या ‘विर’ वृत्तीमुळं आणि त्यांच्याच ताकदीवर हे जग आज उभं आहे..
©रामदास