मला असा एकही दिवस आठवत नाही की ज्या दिवशी भगतसिंहांच्या हातात मी एखादं तरी पुस्तक पाहिलं नाही..!

डोक्यावर ब्रिटिश हॅट, अंगावर जॅकेट तर कधी पंजाबी पगडीत, अत्यंत बोलके डोळे, नेटकंचं रूबाबदार मिसरूडं फुटलेलं, काटक शरीररष्टी लाभलेलं, उंचपुरा, गोरा गोमटा, हातात पिस्तूल असलेला ‛भगतसिंह’ आजवर सर्वांनी पाहिलाय. पण हातात आणि जॅकेटच्या खिशात कायमच एक, दोन पुस्तकं बाळगणारा भगतसिंह किती जणांनी जाणलाय हा प्रश्नच आहे. नव्हेतर हा भगतसिंह फार कमी लोकांना माहीत आहे.

अगदी बालपणापासून भगतसिंह पुस्तकं वाचण्यात दंग असत. लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या द्वारकादास वाचनालयाला त्यांनी आपलं घर बनवलं होतं. त्या वाचनालयात भगतसिंह नेहमीच पुस्तकांत हरवलेले असायचे. कायम वाचनात गडलेले असत. वाचनाची त्यांची एवढी भूक होती की अक्षरशः भगतसिंहांना ते द्वाराकादास वाचनालय आणि तेथील पुस्तकं वाचायला कमी पडायचे. इतकं प्रचंड दांडगं आणि टोकाचं वाचन भगतसिंहांचे होते. त्यांचा वाचनाचा हातखंडा फार तगडा होता. विशेषतः चौफेर वाचन त्यांचं होतं. त्यांनी पाठवलेल्या पत्रातून, त्यांचे पेपरमध्ये छापून आलेले लेख, नौजवान भारत सभेचे घोषणा पत्र, कोर्टात पुस्तकातील मजकुराला धरून दिलेली उदाहरणं, केलेली वक्तव्य यातून त्यांचे वाचन व हिंदी, उर्दू, इंग्रजी या भाषेवरील भगतसिंहांचे प्रभुत्व लक्षात येतं.

क्रांतिकारक चळवळीत कारागृहाच्या आत आणि बाहेर भगतसिंहांचा सहवास अनुभवलेले त्यांचे सहकारी शिव वर्मा लिहतात – भगतसिंहांना वाचनाची प्रचंड आवड होती. इतकी की ते अखंड वाचनात बुडलेले असत. जेंव्हा संघटनेच्या संबंधित कामासाठी भगतसिंह कानपुरला यायचे त्यावेळी मी (शिव वर्मा) आणि जयदेव राहत असलेल्या खोलीत आमच्या सोबत राहत असतं. भगतसिंह कानपूरला येताना प्रत्येकवेळी त्यांच्या सोबत दोन, चार तरी पुस्तकं नेहमीच असायाची. आम्ही राहत असलेल्या खोलीत भगतसिंहांचा सर्वात जास्त वेळ हा वाचनात जायचा. विक्टर ह्युगो, हलकेन, टॉलस्टॉय, ड्रौस्टोवस्की, गिर्की, बर्नार्डशा, डीकेन्स, असे अनेक त्यांचे प्रिय लेखक होते.

जेंव्हा शिव वर्मा आणि जयदेव महाविद्यालयातुन परत खोलीवर जायचे. तेंव्हा भगतसिंहांशी चर्चा करायचे तर त्या चर्चेत अधिक विषय हा भगतसिंहांनी वाचलेल्या पुस्तकांचाचं असायचा. ते त्या पुस्तकांबद्दल तर सांगायचेच पण भगतसिंह जे वाचायचे ते आपल्या (शिव – जयदेव ) सहकाऱ्यांनीही आवर्जून वाचावं असा आग्रह धरायचे. त्यात ते कधी कधी क्रांतिकारकांच्या कथाही सांगत असत कुका विद्रोह, गदर पार्टीचा इतिहास, कर्तार सिंह सराभा, सूफी अम्बाप्रसाद यांचं जीवन, बब्बर अकाली दल यांच्या शौर्याच्या कहाण्या सांगताना भगतसिंहांची वर्णन शैली इतकी आकर्षक आणि जबरदस्त होती की पुढं शिव वर्मा लिहतात की मी आणि जयदेव महाविद्यालयाच्या सुट्टीच्या आधीच भगतसिंहांकडे आपसूक ओढले जायचो. त्याची बोली भाषा इतकी प्रभावी होती. पुढं फरारी जीवनात भगतसिंहांच्या बरोबरही राहण्याच्या योग आला तेंव्हा तर पुस्तक आणि पिस्तुल हे दोन शस्त्र चोवीस तास कायमच त्यांच्या सोबत होती. मला असा एकही दिवस आठवत नाही की ज्या दिवशी भगतसिंहांच्या हातात मी एखादं तरी पुस्तक पाहिलं नाही..!

इस कदर वाकिफ है.. मेरी कलम मेरे जज़बातों से.. गर मैं इश्क भी लिखना चाहूँ तो भी ‛इंकलाब’ ही लिखा जाता है – भगतसिंह ✍️

ते वाट चुकलेली वेडी पोरं नव्हते तर ते अत्यंत कमी वयात देशभक्तीने पेटलेले होते. वैचारिक अधिष्ठान कमवलेले तरुण होते. स्वातंत्र्याच्या ध्येयाने झपाटलेले हे नवखे पोरं देशासाठी आपलं सर्वस्वं त्यागायला निघाले होते..!

(शिव वर्मा यांच्या आठवणीतून)

#क्रांतीपर्व
#राष्ट्रप्रथम🇮🇳
#इंकलाब_जिंदाबाद
#शहीददिवस_२३_मार्च

© रामदास कराड

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: