‘तुझ्या आठवणी आणि तू…’

आता नाही जाणं होत, कधी तुझ्या गल्लीत. त्या वळणावरही नाही कधी थांबणं होत, जिथून तुझ्या घराची खिडकी दिसायची. आणि त्या खिडकीतून तू दिसयचीस. काळ बदलला, आपण मोठे झालो, पण तुझ्या बद्दलची ती भावना आजही मनात घर करून आहे.

हल्ली मीही फारसा तिकडे फिरकत नाही, जिथं नेहमी तुझी वाट पाहत बसायचो. कधीतरी जाणं होतं पण तो आपलेपणा आता तिथं जाणवत नाही. कुणाची तरी वाट पाहणं फार प्रेमळ असतं. तो काळच वेगळा होता आणि हो.. ती वेळही…

वयाने वाढलो, जवाबदारीने कर्तव्यापोटी घराबाहेर पडलो, पर्यायाने ती गल्ली आणि शहरही आता सोडलंय मी. पण कधीतरी शांत निवांत असलो की तुझ्या आठवणी मनात गुंता वाढवतात. नेहमीच !

ऐकलंय मी की आता तुला एक मुलगी आहे, सुंदर असेल ती देखील तुझ्यासारखीच. शांत स्वभावाची आणि गोडही अगदीच तुझ्यासारखीच , तुझं आता नवीन आयुष्यात पदार्पण झालंय , कुणाची तरी अर्धांगिनी होऊन एका मुलीची आई झालीयेस तू..

तू सुखी असशीलच तुझ्या जीवनात. आणि असाविसही ! आता काळ पार पुढे लोटलाय.. आणि हो.. मी देखील काळाप्रमाणेच सर्व मागे टाकून पुढं निघून आलोय.. पण तुझी आठवन आजही या लोकांनी भरलेल्या शहरात मला एकटं करते.

समजावतो मी स्वतःला. कित्येक वेळा. पण मन माञ वेडं मानायलाच तयार होत नाही.

© रामदास कराड

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: