तरुण तेजस्वी !

राहून राहून वाटतंय, की बिहारमध्ये तेजस्वी यादवचे सरकार येईल. एक युवा चेहरा नव्या उमेदीने या निवडणुकीत उतरला होता, या निवडणुकीच्या निकलांवर १८ ते ३० या वयोगटातील बहुतांश तरुण मतदारांचा अधिक प्रभाव असणार आहे. ज्यांनी स्वतःच्या भविष्यासाठी बिहार निवडणुकीत मत दिलंय. बिहारचे बेरोजगार तरुण तेजस्वीच्या रूपाने बदल पाहतायत.

अगदी सुरवातीपासून मी आवर्जून बिहार निवडणूकीच्या अपडेट्स पाहतोय. तेजस्वीची बोलण्याची, लोकांमध्ये जाण्याची, मिसळण्याची, आपलेपणाची आणि सर्वात महत्वाची म्हणजे बेरोजगार तरुणांना काय हवंय तर रोजगार हा ज्वलंत प्रश्नावर वातावरण निर्माण करण्याची पद्धतच तेजस्वीला बिहारच्या राजसिंहासणावर विराजमान करील असे मनोमन वाटतंय!

तेजस्वीचे अनेक भाषणं मी या निवडणुकीत पाहिली. बिहारच्या पिढ्यानपिढ्या रखडलेल्या अनेक मुद्यांमध्ये बिहारच्या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा त्यात मुख्य मुद्दा होता. आजच्या स्थितीत कोरोना, महामारी ही कितीही भयंकर असली तरी उपाशी पोट आणि बेरोजगारी या मूळ मुद्याला बाजूला सारता येणार नाही, हेच तेजस्वीने वेळोवेळी आपल्या भाषणांतून बोलून दाखवलं आहे.

मुळात यादव कुटुंबातील तेजस्वी हा प्रस्थापित घरण्यातूनच येतो. पण प्रस्थापित असूनही फक्त एक तरुण चेहरा, नव्या, खऱ्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर बोलणारा तरुण तेजस्वी म्हणून मला त्याच्या हेवा वाटतोय. नाहीतरी नितीशजीचं वय झालंच आहे, हे कुणीही नाकारणार नाही. आणि त्यांनीच खरं तर नव्यांना संधी द्यायला हवी होती मग तो कुणीही असो. पण तसं घडताना दिसलं नाही.

“रस्सी जल गई मगर बल नही गया” या उक्तीनुसार नव्यांना आजही संधी कुणीच देत नाही, मग तो कुणीही असो. नव्यांना कायमच संधी मिळवण्यासाठी लढावं लागतं. भांडावं लागतं. प्रसंगी बंडही करावा लागतो. एकंदरीत मला बिहारची निवडणूक ही नव्या विरुद्ध जुन्याची लढाई दिसतेय. मोदी-शहांची ताकद घेऊन नितीशजी लढत असले तरी निवडणुकीत बिहारच्या बेरोजगार तरुणांचा मतांवर प्रभाव पाडणारी प्रचंड मोठी फौज तरुण तेजस्वीच पाठबळ होतं.

या निवडणुकीत तेजस्वीवर असंख्य आरोप झाले. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशजींनी सभेतून तेजस्वीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. पण तरुण असूनही स्वतःच समतोल तेजस्वीने कधी ढळू दिला नाही, की खालच्या शब्दांत त्याने कुणाला शब्द उच्चारला नाही. तो लढत राहिला नव्यांसाठी जुन्याविरुद्ध. त्याच्या भाषणातून बिहारच्या तरुणाईच्या मनातील प्रश्न बाहेर पडत होते. कदाचित तोच तेजस्वीचा गुण बिहारच्या तरुणांना आणि सामान्य मतदारांना भावेल.

नितीशजींच्या सभेत त्यांच्या विरुद्ध घोषणा आणि तेजस्वीच्या सभेला तरुणांची अभूतपूर्व गर्दी हाच फरक पाहणाऱ्यांना बिहारच्या बदलाचा नवा चेहरा तेजस्वी आहे, अशी ओळख निर्माण करून देत होता. मागील ५ वर्षांपूर्वीचा तेजस्वी आणि आजचा परिपक्व तरुणांचा तरुण तेजस्वी यादव यात फार अंतर आहे, हे त्याने त्याच्या भाषणांतून बिहारच्या लोकांना दाखवून दिलं आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन असंख्य प्रश्न आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी लढणारा तरुण तेजस्वी बदलाचे वारे घेऊन बिहारच्या निवडणुकीत वावरताना दिसून येत होता.

त्याच सध्याचं वय वर्षे ३० हे अगदी येणउमेदीतलं वय आहे, आणि हेलिकॉप्टर मधून उतरत धावत – पळत सभेच्या स्टेजकडे जाण्याचा त्याचा उत्साह पाहता बिहारमध्ये बदल होणं अटळ दिसतंय. आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे, नव्यांना संधी दिली गेली पाहिजे कारण बिहारच्या बेरोजगार तरुणांचे रोजगाराचे प्रश्न तरुण तेजस्वी चांगल्या प्रकारे समजू शकतील अशी आशा आहे.

नाहीतरी १५ वर्षे नितीशजींचं सरकार होतंच, त्याआधी लालूजींचंही होतं, फरक म्हणावा तर बिहारने नव्या – कोऱ्या तरुणाच्या हातात बिहार दिलंय.. ज्याला बिहारच्या तरुणांच्या प्रश्नांची आणि पोटाची खऱ्यार्थानं जाण आहे. निवडणूकीचा कौल काय तो उद्याच्या १० तारखेला येईलच पण तेजस्वी यादवच्या रूपाने बिहारमध्ये बहार आलीच तर तेथील तरुणांच्या प्रश्नांची जाण आणि जाणीव ठेवून तरुण तेजस्वी यादव त्यात किती खरे उतरतील हे येणारा काळच ठरवेल.. तरुण तेजस्वीला शुभेच्छा आणि तूर्तास इतकंच!

तेज रफ्तार.. तेजस्वी सरकार..
इस बार तेजस्वी तय है..

© रामदास कराड

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: