सांज झाकोळून आभाळ भरून आलेलं. ढगांनी आसमंतात गर्दी केलेली. त्याच्या मनावरचं मळभ जणू आसमंती दाटलेलं. मन उगाचच अस्वस्थ. कुठून तरी वारं वाहत येत होतं. वाऱ्याची मंद झुळूक पानापानात भिनत होती. गावाबाहेरच्या टेकाडावर जाऊन तो स्तब्ध बसलेला.

पावसाच्या टिपटीपीनं चिंब भिजलेली झाडांची पानं पार निथळून निघालेली. सळसळणारा आवाज लक्ष वेधून घेत होता. पावसाची टीपटीप, पानांची सळसळ, वाऱ्याचं धिरगंभीर संगीत. कोण्या कवीच्या शब्दात जन्म घेणारी गझल तो त्या मैफिलीत ऐकत होता. चिंब भिजलेली निथळती पाऊलं त्याला कुठेतरी नेऊ पाहत होती.
© रामदास कराड
शब्द रचना खूप छान आवडली मला
LikeLiked by 1 person
मनःपूर्वक धन्यवाद 😊
LikeLike