काही माणसं फक्त कर्तव्यं करण्यासाठीच जन्मला आलेली असतात. प्रचंड उर्जेनं, इच्छाशक्तीनं भारलेली ही माणसं असतात. आपल्यावर असलेल्या प्रचंड मोठ्या जवाबदारीची जाण आणि भान त्यांना बहुदा जन्मजातच ज्ञात असते.
कर्तव्याची कास धरलेल्या ह्या माणसांना नियतीचंच बळ असावं, कदाचित. आणि कर्तव्याबाबत कर्तव्यदक्ष असण्याचा गुणही जन्मजातच असावा. ह्या अश्या माणसांच्या एकेक गुणांना जेंव्हा जेंव्हा बारकाईनं बघतो तेंव्हा तेंव्हा एक प्रश्न नेहमी पडतो.
की अश्या कुठल्या आचार – विचारांनी आणि ध्येयानं ही माणसं झपाटलेली असतील. झपाटल्यागत अन् तितक्याच झपाट्यानं कामाचा उरक मागे सारनं, झपाटून कामं करणं, ह्या अश्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वाचा सारासार विचार करता विचार करणाराच अचंबित होऊन जातो.
राज्याच्या राजकारणातलं अजितदादा पवार हे असंच एक व्यक्तिमत्त्व आहे. ‘वादळी’. म्हणूनच मी वरती दादांना वादळी व्यक्तिमत्त्व असं संबोधलं. नेहमी वादळाला वाट दादांची दिसते. पण दादा त्या वादळांना वाट सोयीस्कररित्या करून देतात. नव्हे तर ते सहज परतवून लावतात. अगदी पद्धतशीर.
या राज्याच्या राजकीय राजकणारत वादळ आणि दादा. दादा आणि वादळ हा विषय महाराष्ट्राला आणि इथल्या माणसांना परिचयाचा झालेला आहे. तो नवीन नाही. कालच्या ईडीच्या फेऱ्यातले अजितदादा पुन्हा एकदा राज्याच्या चर्चेचा विषय बनले आहेत. पण दादा माञ आपल्या कर्तव्यातचं दंग असलेलले पाहायला मिळतायत. संबंध महाराष्ट्र दादांना कर्तव्यात गुंतलेलंच पाहतोय.
अनेक कलागुणांचा आविष्कार असलेल्या अजितदादांचा हा सर्वोत्तम गुणच दादांच्या सच्चा आणि पक्क्या व्यक्तिमत्त्वाची ग्वाही आहे. काम करण्याची पद्धत. सर्वांना हाताळण्याची हातोटी आणि सचोटी दादांच्या खरेपणाचीच साक्ष आहे.
कालच दादांचा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या समवेतचा सिंधुदुर्गचा दौरा पाहिला. मुंबईहुन सिंधुदुर्ग तिथला कार्यक्रम आटोपून परत मुंबई आणि मुंबईहुन मराठवाडा अतिवृष्टी आढावा बैठकीस औरंगाबाद. औरंगाबादची आढावा बैठक आटोपून पुणे आणि पुणे येथून मोटारीने बारामती.

ह्यात विशेष हे सांगायचं होतं की बारामतीत रात्री उशिरा पोहचून सकाळी ६ वाजता दादा एका विकास कामाच्या बाबत सरकारी अधिकारी वर्गांसमवेत स्थळ पाहणी आणि विकास आराखड्याबाबत चर्चा करत होते. सकाळी ६ वाजता बरं का. जेंव्हा बारामतीकर आणि महाराष्ट्र साखर झोपेत असतो.
हा दादांचा स्वभाव गुण आहे की जन्मजात गुण आहे, या प्रश्नाचे उत्तर मला शोधूनही सापडत नाही. कधी योग जुळून आलाच तर तो दादांनाच विचारेल. तर मिञहो… सांगायचं हे होतं, की दादांवर आरोप-प्रत्यारोप आणि अश्या ईडीच्या सीडी कितीही केल्या तरी हा कर्तव्याची कास धरलेला कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यकठोर व्यक्ती थांबत नसतो.
कितीही आरोप होऊद्या.. चोकश्या होऊद्या.. कितीही राजकीय जखमा होऊद्या.. पण वादळी दादा दम घेत नसतो. थांबत नसतो. कारण ईर्षेनं पेटलेल्या माणसाला जखमांचं भान नसतं, हेच खरं. अश्या असंख्य वादळातून दादा सहीसलामत कायमच बाहेर पडलेले आहेत, हा देखील अजितदादांचा एक इतिहास आहे, हे महाराष्ट्र खूब जाणून आहे !!
© रामदास कराड
98881219777